पैठण, (प्रतिनिधी): पैठण नगर परिषदेच्या २५ सदस्य पैकी २१ व नगराध्यक्ष निवडून देण्यासाठी ०१ डिसेंबर रोजी मतदान झाले आहे परंतु प्रभाग क्रमांक ०६ च्या (अवब), प्रभाग क्रमांक ०३ च्या (अ) तसेच प्रभाग क्रमांक ११ मधील (ब) या जागेचा वाद न्यायालयात गेल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
आता या ०४ जागांसाठी २० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक ३. ६,११ च्या निवडणूक कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
प्रभाग क्रमांक, ३ मध्ये मावळत्या नगरसेविका अशा विश्वानाथ जगदाळे, यांच्या समोर माजी नगराध्यक्ष राजू गायकवाड यांच्या मुलीचे व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र उगले यांच्या पत्नीचे आव्हान आहे.
तसेच प्रभाग क्रमांक ११ प्रभाग क्रमांक सहा मध्ये महत्त्वाची लढत :
प्रभाग क्रमांक सहा (अ) मध्ये माजी नगराध्यक्ष राखी परदेशी यांची सून तसेच माजी नगराध्यक्ष जीतसिंग कोरकोटक यांची मुलगी मोना जीतसिंग करकोटक यांच्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जितू परदेशी यांच्या मातोश्री व मावळत्या नगरसेविका अलका गोपाल सिंग परदेशी तसेच सामाजिक युवा कार्यकर्ते योगेश गव्हाणे यांच्या पत्नी प्रियंका योगेश गव्हाणे. यांचे आव्हान आहे.
तसेच प्रभाग क्रमांक ०६ मधील (ब) मध्ये मावळते नगरसेवक बजरंग लिंबोरे, यांच्यासमोर निवृत्त पोलीस अधिकारी गोपीचंद गव्हाणे, भाजपचे माजी शहराध्यक्ष सिद्धार्थ परदेशी, माजी नगरसेवक अंबादास ढवळे यांचे चिरंजीव मनोज ढवळे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अश्विन लक्कडहार यांचे आव्हान आहे.
मध्ये माजी नगराध्यक्ष तथा इंदिरा काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष हसनोद्दीन कट्यारे यांच्यासमोर भाजपचे कार्यकर्ते रशीद कुरेशी, मन्नान बाबा मिया कुरेशी, मूफीदूर रहमान अब्दुल रहेमान, खान हमीद मुर्तुज, सामाजिक कार्यकर्ते निसार बागवान यांचे मोठे आव्हान आहे.
सदरील जागे वरील आपापल्या उमेदवारासाठी छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी, माजी मंत्री अनिल पटेल, माजी आमदार संजय वाघचौरे, माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्या आहेत. या निवडणूक कडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.














